बैलगाड्यांच्या शर्यती ही महाराष्ट्राची परंपरागत संस्कृती आहे. ग्रामीण भागात ग्राम दैवतांच्या उत्सवानिमित्त यात्रा पार पडते त्यात मुख्य आकर्षण बैलगाडा शर्यतींचे असते. यामुळे कामानिमित्त विखुरलेला समाज एकत्र येतो, पै पाहुणे घरी येतात, शेतकरी वर्ग लहान मुलांमध्ये एक आनंदाच वातावरण असत. आपली सर्व दु:ख विसरुन नावालाच फक्त राजा असणारा माझा शेतकरी त्या दिवशी एक दिवस का होईना राजा म्हणून मिरवतो. यात्रेमध्ये गोरगरीब लोकांची दुकाने मोठ्या थाटाने ऊभी राहत. त्या निमित्ताने पैशाची देवाणघेवाण होऊन मोठी आर्थिक उलाढाल होते. शेतकरी वर्ग एक दिवस का होईना खुष राहायचा पण बैलगाडा शर्यत बंदीच्या जाचक निर्णयाने गरिबांच्या पोटावर पाय पडला. खेळणी, छोटे हॉटेल व्यावसायिक, वाजंत्री, ऊसाचे रसवाले व यात्रे निमित्त व्यवसायावर अवलंबून असणारे इतर व्यवसायिक आज अडचणीत आलेत, या बंदीने परंपरेनुसार चालत आलेली संस्कृती मोडकळीस चालीय कि काय ही भीती वाटू लागली आहे. कुठे तरी हे थांबायलाच हव नाहीतर बैल हा प्राणी पुढच्या पिढीला पुस्तकात शोधावा लागेल.
महाराष्ट्रात खिल्लार अन कर्नाटकातील म्हैसूर जातीचे बैल चपळ असल्यामुळे शर्यतीमध्ये या बैलांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. बैल बाजार देखील बंदीमुळे थंडावले आहेत. यांत्रिकी करणामुळे शेतीच्या कामातून बैलांचा वापर फार कमी झाला आहे. एकीकडे सरकार गोवंश वाचावा म्हणून प्रयत्न करतंय तर दुसरीकडे ही अशी बंदी घालून शेतकऱ्याला अडचणीत टाकतय.
बैलगाडा शर्यती दरम्यान बैलांचा छळ होतो, कृरपणे वागवलं जात असं स्पष्ट करत केंद्र सरकारने जुलै २०११ मध्ये एक अद्यादेश काढून बैलांच्या शर्यतीवर बंदी घातली. बैलगाडा मालकांच्या संघटना मुंबई उच्च न्यायालयात गेल्या त्यानंतर त्याठिकाणी बैल, वळू आणि सांड या संज्ञेवर युक्तिवाद करून १२ सप्टेंबर २०१२ रोजी बैलगाडा मालकांनी बाजी मारली. त्यानंतर शर्यत पूर्ववत चालू झाली. पुढे २ महिन्यातच प्राणी मित्र संघटनांनी बैल, वळू आणि सांड हा एकाच प्राणी आहे असं न्यायालयाला पटून दिल व २६ नोव्हेंबर २०१२ रोजी बैलगाडा शर्यतीवर पुन्हा बंदी आली. मुंबई उच्चं न्यायालयात निर्णय विरोधात गेल्यामुळे बैलगाडा संघटनांनी सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले तिथे दोन्ही बाजूनी जोरदार आरोप प्रत्यारोप होत शेवटी सुप्रीम कोर्टाने १५ फेब्रुवारी २०१३ या दिवशी शर्यत बंदीच्या निर्णयाला काही नियम अटी घालून स्थगिती दिली. त्यानंतर शर्यती पुन्हा धुमधडाक्यात चालू झाल्या. दरम्यान ज्या नियम व अटी कोर्टाने दिल्या होत्या त्या काही ठिकाणी पाळल्या गेल्या नाही. त्यात काही प्राणी मित्र संघटना खोटे पुरावे गोळा करत पुन्हा कोर्टात गेले अन ७ मे २०१४ रोजी सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यत बंदीचा अंतिम निकाल दिला. बैलगाडा मालकांमध्ये पुन्हा निराशेचे वातावरण झाले एवढा संघर्ष करत कोर्ट विरोधातच निर्णय देत होते. केंद्रात २६ मे २०१४ नंतर भाजप सरकार आले. सर्व बैलगाडा मालकांचा अन संघटनांचा एकच आग्रह होता आता केंद्र सरकारने कायद्यामध्ये बदल करावा अन यामागणासाठी बैलगाडा मालकांनी तत्कालीन पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे साकडे घातले. तामिळनाडू राज्यातील जल्लीकट्टु ही स्पर्धा संक्रांतीला असते त्यापार्श्वभूमीवर तब्बल २ वर्षांनी केंद्र सरकारने ७ जानेवारी २०१६ ला नवीन राजपत्र काढून त्यात नियम व अटी टाकून शर्यतींना परवानगी दिली. परंतु सर्व प्राणी मित्र संघटना त्या निर्णयाविरोधात एक झाल्या आणि त्यानिर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिले. बैलगाडा संघटनानी देखील सुप्रीम कोर्टात धाव घेतली परंतु १२ जानेवारी २०१६ च्या सुनावणी मध्ये कोर्टाने पुन्हा त्या निर्णयाला स्थगिती दिली अन बैलगाडा मालकांच्या पदरी घोर निराशा पडली.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे महाराष्ट्राची बैलगाडा शर्यत, तामिळनाडू मधील जल्लीकटू , कर्नाटक मधील कंबाला सह पंजाब मधील किला रायपूर बैलगाडी शर्यत बंद आहेत. तमिळनाडू मध्ये संक्रांतीच्या मुहूर्तावर होणाऱ्या जल्लीकट्टू स्पर्धा हा तमिळीयन जनतेच्या अस्मितेचा प्रश्न असतो. तिथे सर्व राज्यामध्ये या स्पर्धा होतात परंतु यंदा देखील त्या होऊ शकल्या नाहीत त्यामुळे तिथे खुप अस्वस्थेचे वातावरण होते. सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे तो निकाल लवकर द्यावा असा तमिळनाडू सरकाने कोर्टाकडे आग्रह धरला होता परंतु आमच्या कामकाजात हस्तक्षेप करु नका अस सांगत कोर्टाने त्यांना फटकारले. जल्लीकट्टू स्पर्धा झालीच पाहिजे दोन दिवसात आमच्या मागण्या मान्य करा असा आक्रमक पवित्र घेत मरिना बीचवर मोठ्या संख्येने तमिळनाडुतील जनतेने भव्य आंदोलन केले. त्याची दखल त्यांच्या राज्यसरकारने घेतली व चार दिवसात नवीन अध्यादेश काढून केंद्रातील सर्व परवानग्या घेऊन जल्लीकटू स्पर्धा सुरु केली.
प्राणिमित्र संघटना आरोप करतात शेतकरी बैलांना मारहाण करतात, दारु पाजतात, मिर्चीची पुड डोळ्यात टाकतात वगैरे वगैरे परंतु या एकाही आरोपात तथ्य नाही किंवा तसा पुरावा देखिल नाही. दारु पिऊन माणुस सरळ चालु शकत नाही तर एका रेषेत धावने लांबच. धादांत खोटे आरोप करुन शेतकर्याला नाडण्याच काम या पेटा संघटनेने केले आहे. पोटच्या पोरापेक्षा जास्त आपल्या जित्राबावर प्रेम करनारा माझा बळिराजा येवढा निष्ठूर नाही. घोड्यांच्या शर्यतीत अपघात होतात, साखर कारखान्यांमध्ये ३ टनापेक्षा जास्त ऊस बैल वाहुन नेतात, कत्तलखाने सर्रास चालु आहेत तिथे कधीच या प्राणीमित्र संघटनांनी आक्षेप घेतला नाही. महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना एक रुपयाची देखील मदत या स्वंयघोषित प्राणीमित्रांनी केली नाही. एनजीओच्या नावाखाली परदेशातुन पैसे लाटायचे व इथल्या शेतकर्यांना नाडायच येवढच काम या पेटा संस्थेने केल आहे, या संस्थेवर सरकारने बंदी घालावी व तामिळनाडूच्या धर्तीवर राज्य सरकारने देखील लवकरात लवकर अशाप्रकारे कायदा करून शर्यत चालू कराव्यात किंवा केंद्र सरकारच्या १९६० च्या प्राणी कृरता कायदा अनुच्छेद २२ मध्ये सुधारणा करून शर्यतींना सशर्त परवानगी द्यावी.
- समीर प्रभाकर थोरात
Monday, 30 January 2017
बैलगाड्यांच्या शर्यतींना सशर्त परवानगी द्यावी

Monday, 2 January 2017
त्यानंतर आख्खा गाव अंगठाछाप माणसाला मास्तर म्हणु लागला
माझ्या आजोबाला 'गोविंदा मास्तर' का म्हणन होते त्याच कारण आज समजलं
आज एक बुजुर्ग व्यक्तिमत्व भेटल सहज बोलताना माझ्या कुटुंबाचा विषय निघाला.
ते म्हटले तुला तुझ्या आज्याला मास्तर का म्हणत होते माहीत आहे का?
म्हटल नाय,
मी सांगतो म्हटले तुला किस्सा
"तुमच्याकडं बकरं होती १९४८ ला आम्ही १५० रुपयाला १ खंडी बकर घेतली. नंतर तुझा आजा मुंबईला जाऊन तिकड कंपनीत काम करीत होता.गावाला आल्यावर एक दिवस तुझा आज्जा फिरत फिरत मांजरवाडीला गेला होता तिथं एका माणसाच्या बकरांमधी त्यांना तुमची बकर दिसली.
त्या बकरावाल्यान अट टाकली तुम्ही जर बरोबर ओळखली तर तुमची बकर तुम्हाला देऊन टाकु.
त्यांनी ४ वर्षानंतर त्या कळपातुन बरोबर ७ बकर बाजुला काढली.
समोरचा बकरावाला नतमस्तक झाला अन म्हटला खरच तुम्ही यातल "मास्तर" आहात राव.४ वर्षानी बकर तुम्ही तुमची बकर वळखुन काढली म्हणजे खरच तुम्ही मास्तर आहात.
त्यानंतर आख्खा गाव अंगठाछाप माणसाला मास्तर म्हणु लागला
Subscribe to:
Posts (Atom)