गेल्या ३५ वर्षात वळसे पाटील साहेबांनी आंबेगाव तालुक्याच प्रतिनिधित्व केल आहे. विकासाचा एकमेव अजेंडा घेऊन साहेबांनी आपली कामगिरी सुरु केली. भौतिक व शाश्वत असे विकासाचे दोन प्रकार पडतात पैकी शाश्वत विकासचं उद्याची भावी पिठी सक्षम करु शकतो याची जाण नेतृत्वाला होती. म्हणुन डिंभे धरण, डावा-उजवा कालवा, घोड नदीवर कोल्हापुरी बंधारे झाले.
दुष्काळी असनार्या तालुक्यात पाणी फिरु लागले. गाव, वाड्या, वस्त्या बागायती झाल्या. भीमाशंकराच्या नावाने साखर कारखाना उभा राहिला. फक्त पाऊसाच्या पाण्यावर पेरण्या करनार्या गावांनी बारमाही पाणी लागनारा ऊस पिकु लागला. बाजार भाव मिळाला. बाजार समितीत तरकारी सुरु झाली. कांदा बटाटा मार्केट व उपबाजार झाले. बटाटा बियाण्याच मार्केट म्हणुन तर राज्यात पसंती मिळाली. आदिवासी मुला मुलींच्या निवासी आश्रमशाळा सुरु झाल्या. प्रशासकिय इमारती दिमाखदार झाल्या. मंचर सोबत घोडेगाव व पारगाव याठिकाणी हक्काचे पोलिस स्टेशन सुरु झाले. रस्ते झाले, साकव झाले, दोन गावांना जोडनारे पुल झाले. शाळा, कॅालेज झाले. उपजिल्हा रुग्णालय सुरु झाले गोरगरिबांच्या डिलेवरी व ॲापरेशन ५ रुपयाच्या केस पेपरवर व्हायला लागली. शरद बँकेने आर्थिक समृद्धी आणली. सहकाराच्या कक्षा बळावल्या आंबेगावच नावलौकिक जिल्ह्यात व राज्यात झाला.
याच अनूभवाच्या जोरावर राज्यात मंत्री म्हणुन काम करायची संधी मिळाली. उच्च तंत्र शिक्षण मंत्री, ऊर्जा मंत्री, राज्य उत्पादन शुल्क मंत्री, अर्थ मंत्री, सहकार मंत्री, विधानसभा अध्यक्ष ते गृह मंत्री……
ज्या विभागाचा कारभार हातात घेतला त्याविभागाला गती देण्याच काम केलं. वळसे पाटील साहेब कधीही कोणत्या घोटाळ्यात किंवा कोणत्याही विरोघी पक्षातील नेत्याने त्यांच्यावर आजवर आरोप केला नाही. स्वच्छ चारित्र्याचा व हुशार मंत्री अशी त्यांची ओळख त्यांनी जपण्याचं काम केल. मित भाषीय , कमी बोलायच पन काम करत राहायच, मिडीया व ब्रेकिंग न्युजच्या गराड्यात राहायच नाही.
अगदी काल परवाच उदाहरण बघा आपल्या आंबेगाव शिरुर परिसरात रात्रीच्या वेळी ड्रोन आकाशात फिरत आहे. नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. अशावेळी वळसे पाटील साहेबांनी आपली भूमिका कशी मांडली नाही असा आपण विचार करत होतो तोच बातमी आली की वळसे पाटील साहेबांनी विषयाच गांभिर्य ओळखुन मुंबई मंत्रालय येथे बसुन तात्काळ ॲंट्रीड्रोन (ड्रोन पाडण्याच मशीन) साठी १५ लक्ष निघी उपलब्ध करुन दिला व पुण्याचे जिल्हाधिकारी व एस पी यांच्या संपर्कात ते सतत होते.
सांगायचा मुद्दा हा की प्रसिद्धी साठी हेडलाईन देणे, मिडीयी मॅनेज करने हे कधी साहेबांनी केलच नाही. आपल कामच यासगळ्याला उत्तर देईल ही त्यांची खासियत आहे.
आता मला सांगा, येवढी आयुष्यभर कमावलेली निष्ठा व चारित्र्याला डाग लावायचं काम ह्या टप्यावर करु नये. हे जे आपल्याला वाटत ते त्यांनाही कळल नसेल का? मग येवढा टोकाचा निर्णय का घेतला ?
अनेक लोक दबक्या आवाजात बोलत होती साहेबांना एखादी नोटिस असेल, यंत्रणेचा दबाव असेल?
पण वळसे पाटील साहेबांनी अनेकदा जाहीर भाषणात सांगितल, “मला ED, CBI किंवा कोणत्यात संस्थेची नोटिस नाही. मी हा निर्णय फक्त आपल्या भागाला वरदान ठरलेल्या डिंभे धरणात होणार्या बोगद्यामुळे घेतला.”
अनेकांना प्रथम ते ही कारण पटले नाही. परंतु आज राज्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे एक पत्र व्हायरल झाले व त्यात असलेल्या बोगद्याच प्रश्न पाहून वळसे पाटील साहेबांनी एवढा कठोर निर्णय कसा घेतला हे समोर आले.
जर हा बोगदा झाला तर आपल्या तालुक्यातील डावा कालवा हा फक्त सरकारी आवर्तनवर सुरू राहील, आंबेगाव, शिरुर व जुन्नर भागात घोड व मिना नदीवर असलेले ६५ कोल्हापुरी बंधारे भरले जाणार नाही,
म्हाळसाकांत, कमळजाई, बोरघर व फुलवडे या चार उपसा सिंचन प्रकल्पांनाही पाणी मिळनार नाही. तालुक्यात बारमाही असणारी शेती सहामाही होईल, आज आपण वळसे पाटील साहेबांना या लढ्यात साथ दिली नाही व आपल्या हक्काचे डिंभ्याचे पाणी बोगद्याने गेले तर तुमच्या भावी पिढी तुम्हाला कधीच माफ करणार नाही...
मा मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पत्रामुळे आज हा विषय व त्याचे गांभीर्य समजले, नाही तर काही लोक ह्या सगळ्याकडे फक्त राजकीय दृष्टीने पाहत होते.
पक्ष व आपापसातले मतभेद सोडुन याप्रश्नावर एकत्र येण्याची गरज आहे. मोठ जनआंदोलन उभ करण्याची गरज आहे.
एक गोष्ट लक्षात घ्या, भविष्यात नवीन नेतृत्व तयार होऊ शकते, राजकीय पक्षांना सुद्धा नवीन नेते, कार्यकर्ते मिळू शकतात पण *पाण्याची गरज फक्त पाणीच पूर्ण करू शकते* , त्यामुळे आता आपण पाणी जाऊ दिले तर आपल्यासारखे करंटे आपणच असू.
वळसे पाटील साहेबांनी एवढा टोकाचा निर्णय कशामुळे घेतला ते आज समजलं,साहेब हा तालुका सदैव तुमच्या सोबत राहील...
~ समीर प्रभाकर थोरात



