Thursday, 16 July 2015

पवारांचे भाकीत खरे ठरणार आणि राज्यात मध्यवर्ती निवडणुका होणार

१९९९ ते २०१४ या १५ वर्षात राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार होते.दुष्काळ,गारपीठ,आरक्षण,रोजगार अशा अनेक समस्या राज्याला भेडसावत होत्याच, परंतु भाजप शिवसेनेला त्याच कधी भांडवल करताच आले नाही.

१५ वर्षानंतर राज्यात सत्ता पालट झाली व भाजप शिवसेना सत्तेत आली.केंद्रातही त्यांचे सरकार आले.
कांदा,दुधाची पावडर यांचे निर्यात बंद केल्यामुळे पडलेला बाजारभाव,
ऊसाचा गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाचा बाजारभाव,अन्य शेतमाला भाव त्यात अवकाळी पाऊस,नंतर दुष्काळ सदृश्य परिस्थिती,
मराठा,मुस्लिम, धनगर समाजाचे आरक्षण,
ललीत मोदी प्रकरणात अडकलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज,राजस्थानचे मुख्यमंत्री वसुंधरा राजे,मध्यप्रदेशचा व्यापम घोटाळा,लालकृष्ण अडवाणींचे आणिबाणीचे भाकीत,महाराष्ट्रातील चिक्की घोटाळा,केंद्रा पाठोपाठ राज्यातील शिक्षण मंत्र्याची बोगस डिग्री.त्यात शिवसेना कधी कधी विरोधकांच्या तालात ताल मिसळते व सामनामधुन भाजपला लक्ष्य केल्याशिवाय राहत नाही.सर्व पाहता भाजप शिवसेना सरकार जास्त काळ टिकेल अस वाटत नाही. 

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष अशा काही आक्रमकपणे सरकारवर तुटुन पडत आहे की लवकरच पवारांचे भाकीत खरे ठरणार आणि राज्यात मध्यवर्ती निवडणुका होणार.

Thursday, 5 February 2015

राज्य सरकारचे १०० दिवस

राज्य सरकारचे १०० दिवस ०१) राज्यातील १ कोटी ७५ लाख 'एपीएल' कार्ड धारकांचे अन्न सुरक्षा कायद्या अंतर्गत मिळनारे रेशन बंद ०२) दुध,ऊस यांसारख्या शेतकर्यांच्या महत्वपुर्ण प्रश्नांवर अजुन निर्णय नाही ०३) मुस्लिम आरक्षण रद्द,कृषी संजीवन योजना रद्द ०४) आडत बंदीच्या निर्णयाला स्थगिती ०५) आरआरझेड कायदा रद्द ०६) विजबील माफ करनार,एलबीटी रद्द करनार,धनगर आरक्षण यांसारखे असंख्य आश्वासनांचा विसर #100DaysofTeamDevendra