Tuesday, 13 June 2023

छावा आता पुन्हा मैदानात उतलरलाय. मैदान मारुनच सोडायच


 काल १२ जुन ससंदरत्न खासदार डॅा.अमोल कोल्हे व माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव तालुक्यातील पश्चिम पट्यातील आदिवासी भागात गावभेट दौर्यात सहभागी झालो होतो. 


सकाळी ८ः३० ला सुरु झालेला हा दौरा रात्री १२ ला संपला. वळसे पाटील साहेब पावसाळा सुरु होण्याआधी याभागाचा दौरा करतात. माळिणची दरड दुर्घटना घडल्यापासुन याभागात अशा प्रकारचा अधिकार्यांसमवेत दौरा करुन अतिपावसापासुन संरक्षणासाठीच्या उपाययोजना करत असतात. 


भीमाशंकराचा आशिर्वाद घेऊन अभिषेक करुन तळेघर येथे पहिली कोपरा सभा झाली. खासदार अमोल कोल्हे अनेक दिवसांनी दौरा करत असल्याने साहजिक अनेक गावच्या सरपंचांनी विकासकामे व तक्रारींचा पाठा वाचायला सुरवात केली. दिवसभराचा दौरा असल्याने सगळ्यांना मनमोकळ बोलायची संधी मिळाली. यादौर्यामध्ये लोकप्रतिनीधी सोबत अधिकारी वर्ग देखील उपस्थित होते. गटविकास अधिकारी, प्रकल्प अधिकारी, नायब तहशिलदार, पाणीपुरवठा, वन विभाग, वीज विभाग, आदी अनेक पदाधिकारी उपस्थित होते. 

वळसे पाटील साहेब लागलीच अधिकार्यांना काम का अपुर्ण आहे कधी पर्यंत पुर्ण होईल. काय अडचण आहे विचारुन लगेच तोडगा काढत होते. सुरवातीला नाराजीचा सुर वाटत असला तरी ना.वळसे पाटील साहेब व खा.कोल्हे यांचे भाषण झाले की वातावरण पुर्ण बदलुन जात होत. याभागातील लोकांचे प्रश्न मुळात फारसे नाहीत. वीज, दळणवळण व आरोग्य अन हे प्रश्न जिल्हा परिषद व राज्य शासनाच्या माध्यमातुन सहज पुर्ण होत असतात.

केंद्र पातळीवर प्रयत्नपुर्वक करायचे जे प्रकल्प किंवा प्रश्न आहेत ते खालील प्रमाणे

१. बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी ज्यापद्धतीने राजपत्रातील संरक्षीत प्राण्यांच्या यादीतुन “बैल” हा शब्द वगळला तसा हिरडा या वनस्पतीचा गौण उपजमधुन शब्द वगळण्याची प्रक्रिया झाली की हा प्रश्न कायमचा मार्गी लागनार आहे. 

२. आदीवासी भागात हक्काचे ‘राष्ट्रीय वन औषधी संशोधन केंद्र’ व्हावे यासाठी खा.अमोल कोल्हे यांनी आयुष मंत्रालयाला पाठपुरावा केला आहे लवकरच तोही प्रकल्प मंजुर होईल आणि या भागात हक्काचा रोजगार व हिरड्याला अधीकचा बाजार मिळायला मदत होणार आहे. 

३. आदीवासी भागातील बनकर फाटा ते घोडेगाव, भीमाशंकर तळेघर मार्गे राजगुरुनगर वाडा हा राष्ट्रीय महामार्ग दर्जा प्राप्त झाला असुन अर्धा रस्ता झाला असुन राहिलेला रस्ता लवकरच पुर्ण होणार आहे. 

४. वनविभागातील अधिकार्यांनी प्रेमाने सामंजस्याने आदीवासी बांधवांशी वागावे व ऐकोप्याने राहावे यासाठीच्या अधिकार्यांना सुचना देणे

५. बिबट्याचा वाढता प्रागुर्भाव रोखन्यासाठी केंद्र शासनाने प्रजनन रोखन्यासाठी एखादी वेगळी पॅालिसी आणावी यासंदर्भात शासनदरबारी पाठपुरावा सुरु आहे.


आदी कामे होत असतात परंतु लोकांना भेटुन त्यांच्याशी सवांद साधला तरी जनतेच प्रेम अफाट मिळत आहे याची प्रचिती आली. 


यादौर्यात तळेघर, म्हाळुंगे, पिंपरगणे, डोण, आसाणे, बोरघर, कानसे व नारोडी येथे सभा झाल्या. 


यामधील पिंपरगणे येथे एका आदिवासी बांधवाने भाषण केल अन अख्खा मंडप गहिवरुन गेला. प्रत्येकाच्या अंगावर शहारे आले. त्यांनी ४० वर्षापुर्वीचा अंगावर पालापाचोळा बांधुन वन वन भटकनारा आदिवासी ते आज बहुजन समाजा सारखा चांगली कपडे घालुन स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केलेला आदिवासी डोळ्यासमोर उभा केला. आज आदिवासी बांधवांची अनेक मुले शासनाच्या विविघ विभागात चांगले अधिकारी म्हणुन काम करतात. याभागात दळणवळण सुधारले, शेतीच्या पाण्यासाठी ठिक ठिकाणी तलाव झाले. अभयारण्य शेजारी असुन एकाही शेतकर्याची जमीन जाऊन दिली नाही व स्थंलातरीत कुणाला व्हावे लागले नाही. आरोग्याच्या सोयी झाल्या, एसटी आली. अन यामागे केवळ वळसे पाटील साहेबांचे दुरदृष्टी नेतृत्व आहे अशी भावना त्यांनी मांडली. खासदार अमोल कोल्हे देखील यावेळी भावुक झाले. 


एक गोष्ट यादौर्यात लक्षात आली ति म्हणजे विकायकामे आंबेगाव तालुक्यात निरंतर सुरुच आहेत, जनतेच भांडण त्यासाठी कधीच नाही. 


खासदार अमोल कोल्हेंवर जनता अजिबात नाराज नाही विरोधकांकडुन जाणीवपुर्वक असा प्रचार केला जातो. गावभेट दौरा केल्यावर त्यांचे व्यक्तिमत्व अधिक फुलत आहे. सेल्फी अन फोटोसाठी नागरीक गर्दी करतात. महिला व तरुण व जेष्ठ नागरिकांमध्ये त्यांची अधिक प्रसिद्धी आहे. 


मला या गावभेट दौर्यामध्ये कानसे ते नारोडी पर्यंत आदरणीय वळसे पाटील साहेब, खासदार अमोल कोल्हे व विवेकदादा वळसे पाटील यांच्या समवेत गाडीमध्ये प्रवास करन्याच भाग्य लाभलं. मी जर्मनीवरुन आल्याचे साहेबांना सांगितले अन तिकडे अन इकडे कसा बदल आहे यासंदर्भातील अनुभव सांगितले व चर्चा केली. tourism, work life balance, infrastructure आदी विषय मी मांडले व त्यावर वळसे पाटील साहेबांशी व खासदार अमोल कोल्हेंशी चर्चा केली. 


आजच्या दौरा कसा झाला, कौंटुबिक जबाबदारी अन दिवसातले १२-१५ तास जनतेची सेवा करताना होणारी पळापळ अन शेवटी जनतेचे प्रश्न सोडवुन त्यांच्या चेहर्यावरचे समाधान पाहुन मिळनारे आनंद हा फार वेगळा आहे, अशी भावना आदरणीय वळसे पाटील साहेबांनी मांडली. अन खासदार कोल्हेंना नेहमी हाच प्रश्न असायचा वळसे पाटील साहेब या वयात ही उर्जा हा उत्साह कसा टिकवतात. त्यावर साहेबांनी हे फार मजेशीर उत्तर दिले. 


नारोडी येथे पोहचलो तेव्हा रात्रीचे ११.१० झाले होते. ४०० ते ५०० लोक वाट पाहात होते. नवनाथ हुले व त्यांच्या सहकार्यांनी अतिशय सुंदर नियोजन केले होते. तुम्ही येवढ्या रात्री वाट पाहात उपस्थित आहेत तुम्हाला पाहुन दिवसभराचा सगळा थकवा दुर निघुन गेला अशी भावना अमोल कोल्हे यांनी मांडली.


२०१९ च्या लोकसभा निवडनुकी दरम्यान मला आठवतय रात्री १ वाजे पर्यंत खासदार अमोल कोल्हे सभा घेत होते. चारशे ते पाचशे लोक त्यांची वाट पाहात गावा गावात थांबुन असायचे. तिच परिस्थिती आज देखील आहे हे आम्ही स्वतः या दौर्यात अनुभवल आहे. छावा आता पुन्हा मैदानात उतलरलाय. मैदान मारुनच सोडायच 💪🏻 Dr.Amol Kolhe Dilip Walse Patil


~ समीर प्रभाकर थोरात 

(संचालक, आंबेगाव तालुका सहकारी खरेदि विक्री संघ)